Friday, April 19, 2013

Various Post in Maharashtra


गोरेगाव येथील राज्य राखीव पोलीस दल गट 8 मध्ये सशस्त्र शिपाई पदाच्या 203 जागा

गोरेगाव (मुंबई) येथील राज्य राखीव पोलीस दल गट 8 मध्ये सशस्त्र पोलीस शिपाई (203 जागा) या पदासाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. प्रहारमध्ये दि. 14 एप्रिल 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mahapoliceonline.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

नवी मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई पदाच्या 20 जागा

नवी मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई (20 जागा) या पदासाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल २०१३ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 14 एप्रिल 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mahapoliceonline.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

जिल्हा निवड समितीमार्फत सोलापूर जिल्हा परिषदेतील 134 जागांसाठी भरती

जिल्हा निवड समितीमार्फत सोलापूर जिल्हा परिषदेतील कृषि अधिकारी (2 जागा), विस्तार अधिकारी-कृषी (2 जागा), तारतंत्री (1 जागा), अंगणवाडी पर्यवेक्षिका-एकात्मिक बालविकास सेवा योजना (4 जागा), विस्तार अधिकारी-शिक्षण (2 जागा), औषध निर्माण अधिकारी (4 जागा), पुरुष आरोग्य सेवक (19 जागा), कंत्राटी ग्रामसेवक (13 जागा), आरोग्य पर्यवेक्षक (1 जागा), आरेखक (1 जागा), स्थापत्य अभियांत्रिका सहाय्यक (6 जागा), पशुधन पर्यवेक्षक (14 जागा), कनिष्ठ सहाय्यक (12 जागा), कनिष्ठ सहाय्यक-लेखा (4 जागा), विस्तार अधिकारी-सांख्यिकी (6 जागा), कनिष्ठ लेखा अधिकारी (1 जागा), परिचर (27 जागा), वाहन चालक (15 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 एप्रिल 2013 आहे. अधिक माहिती www. zpsolapur.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

जिल्हा निवड समितीमार्फत रत्नागिरी जिल्हा परिषदेतील जागांसाठी भरती

जिल्हा निवड समितीमार्फत रत्नागिरी जिल्हा परिषदेतील कनिष्ठ अभियंता (15 जागा), विस्तार अधिकारी-कृषी (7 जागा), पर्यवेक्षिका-एकात्मिक बालविकास सेवा योजना (1 जागा), विस्तार अधिकारी-शिक्षण (2 जागा), औषध निर्माण अधिकारी (6 जागा), वरिष्ठ सहाय्यक-लेखा (3 जागा), पुरुष आरोग्य सेवक (5 जागा), आरोग्य सेवक -महिला (13 जागा), कनिष्ठ आरेखक (1 जागा), आरोग्य पर्यवेक्षक (1 जागा), कंत्राटी ग्रामसेवक (44 जागा), स्थापत्य अभियांत्रिका सहाय्यक (7 जागा), वरिष्ठ सहाय्यक - लिपिक (4 जागा), पशुधन पर्यवेक्षक (8 जागा), कनिष्ठ सहाय्यक- लिपिक (26 जागा), विस्तार अधिकारी-सांख्यिकी (4 जागा), परिचर (28 जागा), स्त्री परिचर (6 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 एप्रिल 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. 15 एप्रिल 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.ratnagiri.gov.in व www.ratnagiri.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

बृहन्मुंबई पोलीस दलात शिपाई/पोलीस शिपाई चालक पदाच्या 980 जागा
बृहन्मुंबई पोलीस दलात शिपाई/पोलीस शिपाई चालक (980 जागा) या पदासाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल २०१३ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाईम्समध्ये दि. 12 एप्रिल 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती 
www.mahapoliceonline.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

ठाणे पोलीस दलात शिपाई पदाच्या 176 जागा

ठाणे पोलीस दलात शिपाई (176 जागा) या पदासाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामना व लोकमतमध्ये दि. 11 एप्रिल 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती
www.mahapoliceonline.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई घटकात पोलीस दलात शिपाई पदाच्या 133 जागा

पोलीस आयुक्त लोहमार्ग, मुंबई या घटकात पोलीस शिपाई (133 जागा) या पदासाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. 12 एप्रिल 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती 
www.mahapoliceonline.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

राज्य राखीव पोलीस दल गट २ मध्ये शिपाई पदाच्या 95 जागा

पुण्यातील राज्य राखीव पोलीस दल गट २ मध्ये पोलीस शिपाई (95 जागा) या पदासाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 12 एप्रिल 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती 
www.mahapoliceonline.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

शहर आणि औद्योगिक विकास महामंडळा (सिडको) मध्ये 4 जागा
शहर आणि औद्योगिक विकास महामंडळा (सिडको) मध्ये मुख्य अर्थशास्त्रज्ञ (1 जागा), वित्तीय सल्लागार (1 जागा), वरिष्ठ लेखाधिकारी (2 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 26 एप्रिल 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाईम्समध्ये दि. 11 एप्रिल 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती 
www.cidco.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

जिल्हा निवड समितीमार्फत ठाणे जिल्हा परिषदेतील 206 जागांसाठी भरती
जिल्हा निवड समितीमार्फत ठाणे जिल्हा परिषदेतील कृषि अधिकारी (4 जागा), कनिष्ठ अभियंता-स्थापत्य (3 जागा), मुख्य सेविका-पर्यवेक्षिका (6 जागा), तारतंत्री (1 जागा), वरिष्ठ सहाय्यक-लेखा (4 जागा), औषध निर्माता अधिकारी (8 जागा), आरोग्य सेवक-फवारणी (16 जागा), आरोग्य सेवक-महिला (17 जागा), कंत्राटी ग्रामसेवक (59 जागा), स्थापत्य अभियांत्रिका सहाय्यक (24 जागा), आरेखक (1 जागा), वरिष्ठ सहाय्यक-लिपिक (6 जागा), पशुधन पर्यवेक्षक (6 जागा), कनिष्ठ सहाय्यक-लिपिक (15 जागा), परिचर (33 जागा), विस्तार अधिकारी-सांख्यिकी (3 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 एप्रिल 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 12 एप्रिल 2013 रोजी व दै. सकाळमध्ये 11 एप्रिल 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती 
http://zpthane.maharashtra.gov.in
 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

जिल्हा निवड समितीमार्फत रायगड जिल्हा परिषदेतील 206 जागांसाठी भरती
जिल्हा निवड समितीमार्फत रायगड जिल्हा परिषदेतील कनिष्ठ अभियंता-स्थापत्य (3 जागा), विस्तार अधिकारी-कृषी (8 जागा), प्रयोगशाळा तंत्रज्ञ (1 जागा), पर्यवेक्षिका-एकात्मिक बालविकास सेवा योजना (3 जागा), विस्तार अधिकारी- शिक्षण (1 जागा), औषध निर्माता (6 जागा), वरिष्ठ सहाय्यक-लेखा (1 जागा), आरोग्य सेवक-महिला (17 जागा), कंत्राटी ग्रामसेवक (14 जागा), आरोग्य पर्यवेक्षक (1 जागा), विस्तार अधिकारी- पंचायत आणि समाज कल्याण (1 जागा), वरिष्ठ सहाय्यक-लिपिक (1 जागा), पशुधन पर्यवेक्षक (3 जागा), कनिष्ठ सहाय्यक-लिपिक (11 जागा), कनिष्ठ सहाय्यक- लेखा (8 जागा), विस्तार अधिकारी- सांख्यिकी (2 जागा), लघुलेखक-निम्नश्रेणी (1 जागा), शिपाई/परिचर (10 जागा), स्त्री परिचर (2 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 एप्रिल 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळ व सामनामध्ये दि. 12 एप्रिल 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://zpraigad.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात कंत्राटी तत्वावर 34 जागा

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात स्टाफ नर्स (15 जागा), लॅब टेक/असिस्टंट (1 जागा), फार्मासिस्ट (8 जागा), रेडिओग्राफर (4 जागा), आरोग्य निरीक्षक (4 जागा), लॅब सुपरिटेडंट (2 जागा) ही पदे तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत. या पदासाठी थेट मुलाखती दि. 6 मे ते 9 मे 2013 या कालावधीत होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 12 एप्रिल 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

नाशिक येथील सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयात 20 जागा
नाशिक येथील सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयाच्या आस्थापनेवर तांत्रिक प्रयोगशाळा सहायक (13 जागा), लघुलेखक (1 जागा), विजतंत्री (1 जागा), लोहार (1 जागा), नळ कारागिर (1 जागा), हमाल (3 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 एप्रिल २०१३ आहे. अधिक माहितीhttps://www.maharashtra.gov.in व  http://oasis.mkcl.org/jdte या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

रत्नागिरी येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठात 67 जागा
रत्नागिरी येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या कार्यालयांमध्ये कार्यालय अधिक्षक (4 जागा), सहाय्यक अधिक्षक (5 जागा), लघुलेखक (5 जागा), कनिष्ठ अभियंता-स्थापत्य (2 जागा), कनिष्ठ अभियंता-विद्युत (1 जागा), वरिष्ठ लिपिक (8 जागा), वाहनचालक (6 जागा), आरेखक-स्थापत्य (1 जागा), अनुरेखक (2 जागा), इंजिन चालक (1 जागा), कर्षित्रचालक (4 जागा), मिस्त्री (2 जागा), सुतार (1 जागा), दृकश्राव्यचालक (1 जागा), विजतंत्री (1 जागा), सांधाता (1 जागा), कातारी (1 जागा), छायाचित्रकार (1 जागा), यंत्रचालक बोट (1 जागा), पशुधन पर्यवेक्षक (1 जागा), तांडेल (1 जागा), बोटमन (1 जागा), वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (2 जागा), प्रयोगशाळा सहाय्यक (2 जागा), माळी (3 जागा), स्वच्छक (1 जागा), क्षेत्र संग्राहक (1 जागा), खानसामा (1 जागा), सफाईगार (4 जागा), मजूर (2 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 3 मे 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 6 एप्रिल 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

साहित्य अकादमीमध्ये प्रादेशिक सचिवाच्या 2 जागा
केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाअंतर्गत असलेल्या साहित्य अकादमीमध्ये कोलकत्ता व मुंबई कार्यालयात प्रादेशिक सचिव (2 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसात करावेत. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 6 एप्रिल 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.sahitya-akademi.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये परिचारिकाच्या 334 जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये परिचारिका (334 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट भरती दि. 15 एप्रिल 2013 ते 18 एप्रिल 2013 या कालावधीत होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमत, सकाळ व सामनामध्ये दि. 29 मार्च २०१३ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझरमध्ये 34 जागा
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझरमध्ये वरिष्ठ अधिकारी-वित्त (३ जागा), उपव्यवस्थापक-वित्त (9 जागा), वरिष्ठ अभियंता (17 जागा), वरिष्ठ अधिकारी- सामजिक समुपदेशक (2 जागा), अधिकारी- चिकित्सा (1 जागा), वरिष्ठ अधिकारी-चिकित्सा जनरल सर्जन (1 जागा), वरिष्ठ अधिकारी-चिकित्सा फिजिशियन (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2013 आहे. . यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. 28 मार्च 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहितीwww.rcfltd.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेमध्ये 38 जागा
पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेमध्ये तांत्रिक अधिकारी (4 जागा), तांत्रिक सहाय्यक (3 जागा), तंत्रज्ञ (25 जागा), कक्ष अधिकारी (1 जागा), स्वीय सहायक (2 जागा), स्टाफ वाहनचालक (3 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 22 एप्रिल २०१३ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 30 मार्च २०१३ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.icmr.nic.inकिंवा www.niv.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

कोकण रेल्वे कार्पोरेशनमध्ये अभियंत्यांच्या 3 जागा
कोकण रेल्वे कार्पोरेशनमध्ये उप मुख्य अभियंता -सिव्हिल डिझाइन (१ जागा), सहायक अभियंता (2 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2013 आहे. यासंबंधीचा अधिक माहिती http://www.konkanrailway.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भंडारा येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये 541 जागा
भंडारा येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये दरवान-पुरुष (5 जागा), प्रयोगशाळा सहायक (1 जागा), बॉयलर अटेडंट (5 जागा), सुतार (1 जागा), डांगर बिल्डिंग वर्कर (500 जागा), इलेक्ट्रिशियन (6 जागा), फिटर बॉयलर (1 जागा), फिटर-जनरल मेकॅनिक (10 जागा), फिटर इन्स्ट्रुमेंट (2 जागा), फिटर पाईप (2 जागा), फिटर रेफ्रिजरेटर (1 जागा), मेकॅनिस्ट (1 जागा), मॅशन (3 जागा), शिट मेटल वर्कर (1 जागा), टर्नर (1 जागा), वेल्डर (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात संकेतस्थळावर प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 23-29 मार्च 2013 च्या अंकात आली आहे. अधिक माहिती व अर्ज www.propex.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

कोकण रेल्वे कार्पोरेशनमध्ये २ जागा
कोकण रेल्वे कार्पोरेशनमध्ये उप मुख्य पर्सनल अधिकारी (१ जागा), मुख्य जनसंपर्क अधिकारी (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 मे 2013 आहे. यासंबंधीचा अधिक माहिती http://www.konkanrailway.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

प्रसार भारतीमध्ये 1238 जागा
प्रसार भारतीमध्ये कार्यक्रम अधिकारी (360 जागा), ट्रान्समिशन एक्झिक्युटिव्ह (806 जागा), ट्रान्समिशन एक्झिक्युटिव्ह - प्रोडक्शन असिस्टंट (72 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 एप्रिल 2013 आहे. अधिक माहितीhttp://ssconline2.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

पुण्यातील भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेत 17 जागा
पुण्यातील भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेत अधिष्ठाता- चित्रपट (1 जागा), प्रोफेसर (एकूण 3 जागा), सहयोगी प्राध्यापक (4 जागा), सहायक प्राध्यापक (8 जागा), चित्रपट संशोधन अधिकारी (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 23-29 मार्च 2013 च्या अंकात आली आहे. अधिक माहिती www.ftiindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अंतर्गत दूरध्वनी चालकाच्या 6 जागा
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अंतर्गत दूरध्वनी चालक (6 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2013 आहे. अधिक माहिती https://www.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षा खात्यात सुरक्षा रक्षकाच्या 968 जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षा खात्यात सुरक्षा रक्षक (968 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट भरती दि. 1 एप्रिल २०१३ ते २० मे २०१३ या कालावधीत होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाईम्समध्ये दि. 16 मार्च २०१३ रोजी व दै. लोकसत्तामध्ये 15 मार्च २०१३ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

1 comment: