Monday, September 17, 2012

सुनीता विल्यम्सकडे अंतराळ स्थानकाची सूत्रे


ऑनलाइन टीम
ह्यूस्टन, दि. १७ - भारतीय वंशाची अमेरिकी अंतराळवीर सुनीता विल्यम्सकडे आता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाची सूत्रे आली आहे. आतापर्यंतच्या अंतराळ स्थानकाच्या इतिहासात महिलेकडे सूत्रे जाण्याची ही दुसरीच वेळ आहे.
गेल्या चार महिन्यांपासून अंतराळमोहिमेवर गेलेल्या एक्स्पेडिशन - ३२ च्या पथकातील सदस्य सोमवारी पहाटे कझाकस्तानजवळ उतरले. रशियन बनावटीच्या सोयूझ कॅप्सूलमधून ते पृथ्वीवर आले.
अंतराळ स्थानकातून ही कॅप्सूल वेगळी होत असताना, सुनीताने गेनाडी पडालका यांच्याकडून या स्थानकाची सूत्रे ताब्यात घेतली. पडालका हे फ्लाइट इंजिनीयर जो अकाबा आणि फ्लाइट इंजिनीयर सर्जी रेव्हिन यांच्यासह पृथ्वीवर आले आहेत.
सुनीताकडे आता अंतराळ स्थानकाची जबाबदारी आली आहे.
story from lokmat visit lokmat site here

No comments:

Post a Comment